२७ पोलीस पाटील मिळणार

By Admin | Updated: February 29, 2016 01:38 IST2016-02-29T01:38:50+5:302016-02-29T01:38:50+5:30

वसई तालुक्यात २९ गांवामध्ये रिक्त असलेले पोलीस पाटील पद भरले जाणार आहे. इंग्रजी राजवटीपासून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कामे गावपातळीवर

27 Police will get Patil | २७ पोलीस पाटील मिळणार

२७ पोलीस पाटील मिळणार

पारोळ : वसई तालुक्यात २९ गांवामध्ये रिक्त असलेले पोलीस पाटील पद भरले जाणार आहे.
इंग्रजी राजवटीपासून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कामे गावपातळीवर पोलीस पाटील करत असे. तसेच आपल्या क्षेत्रात होणाऱ्या गुन्ह्याची माहितीही ती पोलीस यंत्रणांना कळवत असे. हे महत्वाचे असणारे पद अनेक वर्ष रिक्त होते. पण उपविभागीय दंडाधिकारी वसई यांनी पोलीस पाटील भरतीचे महत्वाचे पाऊल उचलतो. त्यामुळे सकवार, सायवन, नागले, पारोळ, करजोण, चंद्रपाडा, शिवणसई, खानिवडे, सौरपाडा, आंबोडे, गाडणे, माजीवली, टोकरे, हेंदवडे, भालीवली, डोलीव, खार्डी, कोल्हापूर, अर्नाळा किल्ला, मुक्कामपाडा, पाटील पाडा, खोचिवडे, शिल्लोत्तर, सारजामोरी, मोरी, मालजीपाडा, व देवदळ या गावांमध्ये पोलीस पाटील पद भरण्यात येणार असून सकवार, सायवन, पारोळ, खातिवडे या गावांमध्ये हे पद अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवले असे डोलीव व खार्डी व देवदळ या गावामध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांना संधी देण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: 27 Police will get Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.