वसईत गणेशोत्सवात २५ सायलेंट झोन
By Admin | Updated: August 12, 2015 23:15 IST2015-08-12T23:15:23+5:302015-08-12T23:15:23+5:30
गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी यंदा वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीमध्ये २५ सायलेंट झोन घोषित केले आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण करणाऱ्या

वसईत गणेशोत्सवात २५ सायलेंट झोन
वसई : गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी यंदा वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीमध्ये २५ सायलेंट झोन घोषित केले आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर व वेबसाइटची सुविधा उपलब्ध केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने वरील निर्णय घेतला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सव मंडळांना परवानग्या देण्यात येणार आहेत. हे सर्व झोन शाळा, इस्पितळे परिसरात असून त्याचे काटेकोरपणे पालन होण्याकरिता प्रशासन यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. गणेशोत्सव मंडळांकडून ध्वनिप्रदूषणासंदर्भात कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्यामुळे न्यायालयाने हे आदेश जारी केले. या आदेशाचे पालन करण्याकरिता महानगरपालिकेने आपल्या हद्दीत हे सायलेंट झोन निर्माण केल्याचे सूत्रांनी सांगितले.