शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ठाणे-पालघर जिल्हयातील २४ हजार संस्था संपर्कात नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:37 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.

वसई : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.नोंदणीकृत संस्थांचा कारभार नियमितपणे चालावा, त्यासाठी संस्थांनी नियमितपणे लेखापरिक्षण करावे आणि बदल कळवावेत यासाठी ठाणे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल सादर न करणाºया संस्थांची नोंदणी रद्द होते. अशा संस्थांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाघोली येथील शनी मंदिरात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे धर्मदाय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त रिना राय, छाया उमरेडकर, निरीक्षक राजेश राठोड, कार्यालय अधिक्षक सायली महाजन उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, फादर अल्मेडा, वसई जनता बँकेचे उपाध्यक्ष संतोष देशमुख, शनी मंदिर ट्र्स्टचे जयवंत नाईक, दत्तात्रेय देशमुख यावेळी हजर होते.पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कार्यालयाला कळवले नाहीत तर त्यांची नोंदणी कायद्यानुसार रद्द होते. पण, चांगले सामाजिक कार्य करणाºया संस्थांना काही कारणास्तव लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कळवता आले नसतील असे गृहीत धरून ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे, असेही महाजन यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होणाºया संस्थांना मार्गदर्शन केले जाईल तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार नाही, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.यापुढे लेखापरिक्षण अहवाल किंवा संस्थेतील बदल सादर करण्यासाठी ठाण्याला यायची गरज नाही. चॅरिटी डॉट महाराष्ट्र जीओव्ही या वेबसाईटवर जाऊन संस्थांनी आपले अहवाल सादर करावेत. माहिती देताना वर्गणी मागण्यासाठी जीएसटीची आवश्यकता नाही. पाच हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाºया संस्थांना लेखापरिक्षणाची गरज नाही, अशी माहिती राजेश राठोड यांनी यावेळी बोलताना दिली.पालघर जिल्ह्यात किमान पंधरा हजार नोंदणीकृत संस्था आहेत. असे असताना येथील संस्थांच्या पदाधिकाºयांना ठाण्याला जावे लागते.स्वतंत्र्य कार्यालय हवे!- ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजारांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे. मात्र, यातील २४ हजारांहून अधिक संस्था संपर्कात नसून त्यांच्याशी संवाद साधणेही कठीण जात आहे, अशी माहिती सायली महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.जिल्ह्यासाठी स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत संस्थांना कामासाठी दूरवरच्या ठाण्याला जावे लागते. म्हणूनच स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यात यावे, अशी मागणी या शिबीरात उपस्थित संस्थांच्या पदाधिका-यांनी केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे