शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

२३ गावांचा मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:47 IST

पालघर विधानसभेत वाढवण बंदराला असलेला विरोध आणि केळवे (पूर्व) भागातील नागरिकांना सोयीसुविधांची वानवा असल्याच्या निषेधार्थ अनेक गावातील मतदारांनी मतदानावर घातलेल्या बहिष्काराचे लोण अनेक भागात पसरले होते.

पालघर : पालघर विधानसभेत वाढवण बंदराला असलेला विरोध आणि केळवे (पूर्व) भागातील नागरिकांना सोयीसुविधांची वानवा असल्याच्या निषेधार्थ अनेक गावातील मतदारांनी मतदानावर घातलेल्या बहिष्काराचे लोण अनेक भागात पसरले होते. त्यामुळे या मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली. २०१६ च्या पोटनिवडणुकीत ६५.२४ टक्के मतदान झाले होते. बहिष्कारामुळे त्यात घसरण होत मतदानाने अंदाजे ६० टक्क्यांचा आकडा पार केला आहे.

पालघर मतदारसंघात एकूण पाच उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विराज गडग केंवा काँग्रेसचे योगेश नम यांच्यात आहे. या मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार ५९१ मतदार आहेत.पालघर मतदारसंघातील किनारपट्टीवरील डहाणू ते केळवे दरम्यानच्या गावांनी वाढवण बंदराच्या आणि ‘डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण’ बरखास्त करण्याच्या सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ मतदानावर जाहीर बहिष्कार टाकला होता.

सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, बाडा-पोखरण, धूमकेत, रायतळे, वरोर, वाढवण, चिंचणी, दांडे पाडा, घिवली, कांबोडे, तारापूर, मुरबे, सातपाटी, शिरगाव, वडराई, माहीम, टेंभी, केळवे, नवापूर, उच्छेळी, दांडी, आलेवाडी आणि खारेकुरण या किनारपट्टीवरील गावांत बहिष्काराचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले होते. सातपाटी, मुरबे, शिरगाव, वडराई, केळवे आदी मच्छीमारांच्या गावात संमिश्र प्रतिसाद वगळता अन्य सर्व मच्छिमार गावात हा बहिष्कार दिसून आला. वाढवणसह अन्य गावात शंभर टक्के बहिष्कार यशस्वी झाल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना मतदान करायला लावून हा बहिष्कार अयशस्वी करण्याचा प्रयत्न केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

स्वयंस्फूर्तीने टाकलेल्या बहिष्कारामुळे सकाळपासूनच मतदान केंद्राकडे कोणीही फिरकले नाही. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रावर पोलिंग एजंट म्हणूनही कोणी बसल नव्हते. बहुतांशी तरुणांनी राजकीय पक्षावरील प्रेमापेक्षा समाजहित आणि एकजुटीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर कोणत्याही राजकीय पक्षाचे मतदार सहाय्यक केंद्र (बूथ) दिसले नाहीत. सातपाटी, मुरबे, शिरगाव, आलेवाडी, वडराई, केळवे आदी गावातील सेनेचे बूूूथ वगळता अन्य गावात बूथ दिसले नाहीत.

याच मतदारसंघातील केळवे (पूर्व) झंजरोली, मायखोप गावातील मतदारांनी रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी, खड्डेमय रस्ते, आदी मागणीकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बहिष्कार घातला होता. खा. राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, तहसीलदार शिंदे यांनी मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान