भीषण अपघातात १७ जखमी
By Admin | Updated: February 12, 2017 03:07 IST2017-02-12T03:07:30+5:302017-02-12T03:07:30+5:30
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील उपलाट गावाजवळ बँड पथकाच्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात १७ जखमी झाले असून या पैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे,

भीषण अपघातात १७ जखमी
तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील उपलाट गावाजवळ बँड पथकाच्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात १७ जखमी झाले असून या पैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे,
नवसारी येथून डहाणू येथे लग्न सभारंभा साठी जाणाऱ्या श्री साई बँड पथकांच्या टेम्पोला काजळी उड्डाण पूलावर शनिवारी दुपारी हा अपघात झाला.
त्यात बँड पथकातील एकूण १७वादक जखमी झाले असून त्यातील ६ जण गंभीर आहेत. त्यांना तातडीने सिल्व्हासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य तलासरी रु ग्णालयात उपचार घेत आहेत.
या उड्डाणपुला जवळ वळण असल्याने या टेम्पोचा एका बाजूला तोल जाऊन तो डिव्हायडर वर चढल्याने हा अपघात झाल्याचे चालकांकडून सांगण्यात आले. महामार्गावरील आमगाव, आच्छाड, काजळी या ठिकाणी वळणामुळे अनेक वेळा भीषण अपघात होत असून काही महिन्यांपूर्वी भीषण अपघातात स्थानिक तरुणाचा जीव गेल्याने संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी तोंड भरून आश्वासने दिली होती. परंतु प्रत्यक्षात काहीही झाले नाही. त्यामुळे या निष्क्रियतेविरोधात उग्र जनप्रक्षोभ होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
जखमी नावे :
हितेश राठोड 25, पिंकेश राठोड 22, सुनील राठोड 19, जयंती राठोड 24, हेमंत परमार 42, राहुल राठोड, गिरीश राठोड, सुखदेव रंनछोड , अजय राठोड, किरण राठोड, विशाल राठोड, किशोर भीमा, हेमंत राठोड, शौलेश राठोड, कल्पेश राठोड, विनोद राठोड राहणार सर्वजण नवसरी गुजरात याना उपचारासाठी
रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.