शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पालघर जिल्ह्यात १३२ शाळा अनधिकृत; विद्यार्थ्याचे भविष्य अंधकारमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 12:08 AM

दरम्यान, कारवाईसाठी वसई तालुक्यामधील एका शाळेत गेलेल्या टीमशी बाचाबाची करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचाही  प्रकार घडलेला असून, पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे.

हितेन नाईकपालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत सन २०१७-१८ मध्ये १९९ शाळा अनधिकृत शाळा म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील अनेक शाळांनी शासनाकडून परवानग्या मिळविल्या तर काही बंद पडल्या. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत सद्य:स्थितीत १३२ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले असून, यात ४६ माध्यमिक, तर ८६ प्राथमिक शाळांचा समावेश आहे. प्राथमिक शाळांमध्ये वसई तालुक्यात सर्वाधिक ७२, पालघरमधील ८, तर वाडामधील सहा शाळांचा समावेश आहेत. 

पालघर जिल्ह्यात आढळलेल्या या अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले असून, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झालेले आहे. दरम्यान, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यात एकही शाळा अनधिकृत नसल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी दिली. २०२०-२१ शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात प्राथमिक ८६ शाळा, माध्यमिक ४६ शाळा अनधिकृत ठरलेल्या आहेत. या शाळांवर कारवाई करताना शाळांच्या समोरील गेटवर सदर शाळा ही अनधिकृत असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत.  दरम्यान, कारवाईसाठी वसई तालुक्यामधील एका शाळेत गेलेल्या टीमशी बाचाबाची करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचाही  प्रकार घडलेला असून, पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे.

‘त्या’ शिक्षकांचे शैक्षणिक ज्ञान अपूर्णएकूण १३२ अनधिकृत शाळांपैकी प्राथमिक विभागाच्या शाळांमध्ये ८,४६२ विद्यार्थी, तर माध्यमिक विभागाच्या शाळांमधून ४,८०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अनधिकृत शाळांतील शिक्षकांच्या शैक्षणिक पदव्या या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदी भागातील असल्याचे आढळून आले आहे. त्यांचे शैक्षणिक ज्ञान हे अपूर्ण असल्याने अनेक चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

परप्रांतीय आणि गरीब विद्यार्थ्यांचा भरणाया अनधिकृत शाळांमध्ये परप्रांतीय आणि गरीब विद्यार्थ्यांचा भरणा जास्त प्रमाणात केला जात असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय बनत आहे. या शाळांना एक लाखाचा दंड ठोठावण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. परंतु एकाही शाळेकडून दंड वसूल करण्यात यश आलेले नाही.

टॅग्स :Schoolशाळा