१११ अंगणवाड्यांना स्वजागाच नाही

By Admin | Updated: March 1, 2016 01:57 IST2016-03-01T01:57:35+5:302016-03-01T01:57:35+5:30

विक्रमगड तालुक्यातील २४६ अंगणवाड्या व ४९ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत़ परंतु विक्रमगड तालुक्यातील १११

111 anganwadas can not be saved | १११ अंगणवाड्यांना स्वजागाच नाही

१११ अंगणवाड्यांना स्वजागाच नाही

>तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील २४६ अंगणवाड्या व ४९ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत़ परंतु विक्रमगड तालुक्यातील १११ अंगणवाडया शासकीय इमारतीमध्ये जागा नसल्याने त्या भाडोत्री इमारतीत भरविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून बाल विकास प्रकल्पतंर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडयापाडयात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यांत येत आहेत़. परंतु त्यांना स्वत:ची जागा असावी, अशी काळजी मात्र घेतली जात नाही.
अगोदरच शासनाकडून या केंद्रांना पाहिजे तशा सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत त्यात स्वत:ची
इमारत नसल्याने अनेक अडचणी समोर येत असतात विक्रमगड तालुक्यातील अंगणवाडया व
मिनी अंगणवाडयांसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातून निधी
दिला जातो. तरीही तालुक्यातील २४६ अंगणवाडी केंद्रांपैकी फक्त
१३५ केंद्राना स्वत:ची इमारत आहे.
तर १११ अंगणवाडया या खाजगी किंवा समाज मंदिरात भरविल्या जातात़
शासनाची अथवा स्वत:ची इमारत नसल्याने जागे अभावी अनेक सुविधां विना या अंगणवाड्या आज चालविणे भाग पडते आहे.
यामध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागते आहे. शासनाने अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे धोरण स्वीकारले असले तरी निधी अभावी त्यांची पूर्तता योग्य वेळेत होत नाही.
(वार्ताहर)

Web Title: 111 anganwadas can not be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.