शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:27 IST

Nalasopara News: वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वसई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

- मंगेश कराळे  नालासोपारा - वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वसई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्याने या रिसॉर्टमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. बुधवारी सकाळी विरारच्या कारगिल नगरमधील श्री साई क्रांती चाळीत राहणारी रिद्धी माने (१०) ही चिमुकली आपल्या कुटुंबासह पिकनिकला रानगांवच्या रॉयल रिसॉर्टमध्ये आली होती. घटनेच्या वेळी रिद्धी ही लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये खेळत असताना तिची आई रिद्धीला खाण्यासाठी सामान खरेदीसाठी बाहेर असलेल्या दुकानामध्ये गेली. त्यावेळी रिद्धीने मोठ्या स्विमिंग पुलमध्ये खेळण्यासाठी उडी मारली. पण तिला पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला आहे. वसई विरारच्या रिसॉर्ट मधील जलतरण तलावात यापूर्वी देखील अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुठलेही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :AccidentअपघातVasai Virarवसई विरार