मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १ करोड ३९ लाखांचा दरोडा; सिगारेट भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 13:29 IST2022-10-11T13:28:24+5:302022-10-11T13:29:03+5:30

१ करोड ३९ हजारांचा मुद्देमाल घेऊन ट्रक नवी मुंबईच्या रबाळे येथून घेऊन निघाला होता.

1 crore 39 lakh robbery on mumbai ahmedabad highway the robbers ran away with a truck full of cigarettes | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १ करोड ३९ लाखांचा दरोडा; सिगारेट भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १ करोड ३९ लाखांचा दरोडा; सिगारेट भरलेला ट्रक दरोडेखोरांनी पळवला

लोकमत न्यूज नेटवर्क 

नालासोपारा (मंगेश कराळे): मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सकवार गावाच्या ठिकाणी करोडो रुपयांनी भरलेला सिगारेटचा ट्रक दरोडेखोरांनी पळवल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. 

१ करोड ३९ हजारांचा मुद्देमाल घेऊन ट्रक नवी मुंबईच्या रबाळे येथून घेऊन निघाला होता. त्या ट्रकचा पाठलाग एक चार चाकी गाडी करत होती. महामार्गावरील सकवार गावच्या हद्दीत पहाटेच्या वेळी कार आडवी घालून ट्रक अडवला आणि चालकासोबत घेऊन आरोपी पळाले. चालकाला महामार्गावर सोडून दरोडेखोर ट्रक घेऊन पळून गेले. महामार्गावर दरोडे पडण्याच्या घटना घडत असल्याने ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

मांडवी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी सदर घटनेचा तपास करत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: 1 crore 39 lakh robbery on mumbai ahmedabad highway the robbers ran away with a truck full of cigarettes

टॅग्स :Robberyचोरी