जि.प.चे पथक तळेगावात दाखल
By Admin | Updated: August 29, 2015 02:16 IST2015-08-29T02:16:25+5:302015-08-29T02:16:25+5:30
तालुक्यातील तळेगाव (टालाटुले) ग्राम पंचायत प्रशासनाने मोठा घोळ केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

जि.प.चे पथक तळेगावात दाखल
अहवाल सीईओंकडे सादर : घरासह शौचालयाचे छायाचित्र काढले
वर्धा : तालुक्यातील तळेगाव (टालाटुले) ग्राम पंचायत प्रशासनाने मोठा घोळ केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर कारवाई करीत सीईओ संजय मीना यांच्या आदेशावरून शुक्रवारी एक पथक तळेगाव येथे पोहोचले. तिथे त्यांनी तक्रारीत नमूद असलेल्या मुद्यावरून एका घराचे व घरी असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढले. या छायाचित्राचा अहवाल संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायतमध्ये झालेल्या विविध विकास कामांतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांना दिले. तत्पूवी तक्रारकर्ते व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यानंतर गुरुवारी येथील काही नागरिकांनी मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत कारवाईची मागणी केली. या प्रकरात येत्या १५ दिवसांत ही कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेत आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता.
या प्रकरणात येथील उपसरपंच शारदा देवराव मोहिजे यांनी घोळ केल्याचा आरोप होता. यानुसार मोहिजे यांच्या घराचे व घराच्या परिसरात असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढण्यात आले. यावेळी तक्रार कर्त्यांचीही उपस्थिती होती. याचा अहवाल तयार करून तो जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तक्रारीनुसार या प्रकरणात कारवाई सुरू झाली आहे. अहवाल सादर झाल्यानंतर यातील या प्रकरणात काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)