जि.प.च्या शाळेत मध्यान्ह भोजनात मिळणार संत्री
By Admin | Updated: December 18, 2015 02:36 IST2015-12-18T02:36:24+5:302015-12-18T02:36:24+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

जि.प.च्या शाळेत मध्यान्ह भोजनात मिळणार संत्री
जि.प. शिक्षण विभाग संत्रा उत्पादकांच्या मदतीला : १,०१,६५१ विद्यार्थ्यांना लाभ
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. यात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात संत्री देण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. तशा सूचना जिल्ह्यातील शाळांना देण्यात आल्याची माहिती सभापती मिलिंद भेंडे यांनी दिली. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना क जिवनसत्व मिळणार आहे.
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संत्री आली आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने पोषण आहार देण्यात येत आहे. मिळणारा आहार आरोग्याच्या दृष्टीने असा योग्य आहे अथवा नाही, याची यात काळजी घेण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पोषण आहार कशा प्रकार देणे शक्य आहे. याचा विचार करण्यात आला आहे. संत्र्यातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी मिळत आहे. शिवाय बाजारात आजच्या घडीला संत्री आली आहे. शिवाय तो अत्यल्प दरात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांचा संत्रा विकला जावा, या हेतूने शिक्षण विभागाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात शालेय पोषण आहारांतर्गत १ हजार २५५ शाळेतून पहिली ते आठविच्या १ लाख १ हजार ६५१ विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. यात शासकीय व खासगी शाळांचा समावेश आहे. यात विद्यार्थ्यांना देण्यात येणार असलेल्या आहारात व्हिटॅमीनचा समावेश असावा असे नमूद आहे. यानुसार जिल्ह्यात थंडीच्या दिवसात निघत असलेली संत्री विद्यार्थ्यांना व्हिटॅमीन सी पुरविण्याकरिता लाभदायक ठरणार आहे.