शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टाकरखेडाच्या जिल्हा परिषद शाळेला लागली गळती; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 18:19 IST

ई-लर्निंगचे साहित्य भिजले: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेला गळती लागल्याने ई-लर्निंगच्या साहित्यासह इतर साहित्यही ओले झाले आहे. येथील दोन वर्ग खोल्यात सतत पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अडचणी निर्माण होत आहे. कंत्राटदाराने केलेल्या सदोष कामाचा फटका विद्यार्थ्यांसह शिक्षकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सन २०१४ मध्ये बांधकाम करण्यात आले. पण, कंत्राटदाराने सदोष बांधकाम केल्याने दरवर्षी पावसाळ्यात शाळेला गळती लागते. या शाळेत चार वर्गखोल्या असून दोन वर्गखोल्या गळत असल्याने त्यामध्ये विद्यार्थी बसण्यात अडचण होते. या शाळेचा पट ७५ असून एक ते सातपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत मुख्याध्यापकांसह दोनच शिक्षक असल्याने शिक्षकांचीही अडचण आहे. आता इमारत गळतीमुळे शाळेतील ई-लर्निंगचे साहित्य, प्रोडुसर, एलसीडी व पंखा आदी साहित्य पावसाने भिजून खराब झाले आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंच आदींना माहिती दिली. पण, कुणीही दखल घेतली नसल्याने रोष व्यक्त होत आहे. या शाळेतील स्वच्छतागृहाला भेगा गेल्या असून कधी पडेल याचा नेम नाही. शाळेच्या पटांगणातही चिखल असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शाळेच्या पटांगणात गट्ठ लावण्यात यावे, शाळेची रंगरंगोटी करावी, धान्य मोजण्यासाठी काटा द्यावा, शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी द्यावी, तसेच इमारतीची गळती दुरूस्ती करून नवीन शालेय साहित्य देण्याची मागणी पालकांनी निवेदनातून केली आहे.

लक्ष देण्याची नितांत गरज...टाकरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब गळत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस येत असल्याने हा स्लॅब केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाzpजिल्हा परिषदwardha-acवर्धा