युवकांनी घेतली एड्सच्या समूळ निर्मूलनाची शपथ
By Admin | Updated: August 13, 2015 02:51 IST2015-08-13T02:51:57+5:302015-08-13T02:51:57+5:30
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत नोबल शिक्षण संस्थ, जय विकास माध्यमिक विद्यालय, काजळसरा व ग्रामीण रुग्णालय, ....

युवकांनी घेतली एड्सच्या समूळ निर्मूलनाची शपथ
वर्धा : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत नोबल शिक्षण संस्थ, जय विकास माध्यमिक विद्यालय, काजळसरा व ग्रामीण रुग्णालय, भिडी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनानिमित्त जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गावागावात जाऊन एड्स या आजाराबाबत जागृती करून त्यांना उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश खोडे होते. लिंक वर्कर कार्यक्रम अधिकारी सुचिता बोभाटे, समुपदेशक विजय ओझा, सहाय्यक शिक्षिका रेखा आंबटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समुपदेशक विजय ओझा यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितले क, सकारात्मक विचारधारणा, युवाशक्तीचे महत्व, एच.आय.व्ही. एड्स हा आजार कशामुळे होतो, काय काळजी घेतल्यास होत नाही, एच.आय.व्ही.ची चाचणी, ग्रामीण रुग्णालय, सामान्य रुग्णालयामध्ये मोफत करून देण्यात येते, त्याचा अहवाल गोपनीय ठेवण्यात येतो, याकरीता प्रत्येकाने एच.आय.व्ही. ची चाचणी करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी केले. तर सुचिता बोभाटे यांनी युवक-युवतीमधील शारीरिक व मानसिक बदल याची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकआंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंका-कुशंकाचे निराकरण केले. युवाशक्तीची आरोग्य क्षेत्रात जनजागृती करिता गरज आहे. समाजात एच.आय.व्ही व एड्सबाबत जागृतीची गरज आहे. आजाराबाबत असलेले संभ्रम कमी होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या म्हैसकर यांनी केले. संचालन गणेश पोटे यांनी केले. आयईसी माहिती पुस्तीका विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थींनी व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)