वर्धा जिल्ह्यात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:10 IST2019-12-11T15:10:05+5:302019-12-11T15:10:38+5:30
वर्धा जिल्ह्यात इंझापूर शिवारातील उत्तम पार्क भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वर्धा जिल्ह्यात तरुणाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: इंझापूर शिवारातील उत्तम पार्क भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रवी साखरकर (२५) रा. अल्लीपूर असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, रवी उर्फ विक्की साखरकर याचा फोटो स्टूडिओचा व्यवसाय आहे. काही कामानिमित्त तो वर्धा येथे गेला होता. दरम्यान त्याचा मृतदेह इंझापूर शिवारातील उत्तम पार्क परिसरात आढळून आला. विषारी औषध प्राशन करून सदर तरुणाने आत्महत्या केली असावी असे आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आले आहे. परंतु, कुठल्या कारणाने या तरुणाने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला याचा शोध सावंगी पोलीस घेत आहेत. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.