युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिर
By Admin | Updated: June 16, 2016 02:36 IST2016-06-16T02:36:31+5:302016-06-16T02:36:31+5:30
राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्हास्तरावर ५० युवक युवतीचे ...

युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिर
वर्धा : राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्हास्तरावर ५० युवक युवतीचे युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन १४ ते २३ जून २०१६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.
प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन समारंभ बुधवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती राज्यक्रीडा व जिजामाता राज्यपुरस्कार प्राप्त क्रीडा प्रशिक्षक नंदिनी बोंगाडे तर अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्र, वर्धा चे जिल्हा समन्वयक संजय माटे, शटल बॅडमिंटन असो. वर्धा चे सचिव मोहन शहा, सतीश इंगोले, क्रीडा व युवक, सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष रेवतकर यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये युवक युवतींना व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये युवक युवतींना समुदाय सहभाग, युवकांपुढील आव्हाने व जीवन कौशल्ये, जलसंधारण व पाणलोट, व्यक्तीमत्व विकास व जीवन मुल्याचे शिक्षण, किशोरवयीन मुलामुलींमधील शारीरिक आणि मानसिक समस्यांवर जनजागृती, रोजगार व स्वयंरोजगार विषयी माहिती, विविध योजना व त्यांचे फायदे, जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनांची माहिती, मानवाधिकार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, किशोरवयीन मुला मुलींमधील शारीरिक समस्या, वाढती गुन्हेगारी आणि युवक, दहशतवाद आदी विषयावर तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. संचालन व आभार चारूदत्त नाकट यांनी केले. यशस्वीतेसाठी रवी काकडे, विजय डोबाळे, चैताली राऊत, विश्वास बोकडे, विजय बिसने, रामकृष्ण राहाटे यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)