साहूर येथे विद्युत स्पर्शाने युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:56 IST2020-10-30T19:56:07+5:302020-10-30T19:56:25+5:30

Crime news: साहूर येथील शेतकरी राजेंद्र झाडे यांचे मोजा बोरखेडी शिवारात शेत असून येथील शेतकरी साहेबराव उंबरकर यांनी मकत्यांनी केले आहे

Youth killed by electric shock at Sahur | साहूर येथे विद्युत स्पर्शाने युवक ठार 

साहूर येथे विद्युत स्पर्शाने युवक ठार 

वर्धा :  आष्टी तालुक्यातील साहूर येथील शेत मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील युवक उमेश विठ्ठल पाटोळे वय  (22)याचा शेतात फवारणीला गेला असता विद्युत स्पर्षाने जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी 9:30 वाजता दरम्यान घडली. 


     प्राप्त माहितीनुसार साहूर येथील शेतकरी राजेंद्र झाडे यांचे मोजा बोरखेडी शिवारात शेत असून येथील शेतकरी साहेबराव उंबरकर यांनी मकत्यांनी केले आहे शनिवारी उमेश विठ्ठल पाटोळे हा उंबरकर यांच्या शेतात फवारणी करिता गेला असता तो विहिरीवर पंप भरण्याकरिता गेला.  थ्री फेज लाईन वरील पोल  वरचा पेटीत येणारा सर्व्हिस वायर कटुन इलेक्ट्रिक पोलच्या टेन्शन बारला टच झाला होता. त्या टेन्शन बारमध्ये विद्युत करंट आल्याने उमेश चा त्याला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. परंतु प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार टेन्शन बारला जर इंसुलेटर असते तर हा अपघात झाला नसता. 


    यासंबंधी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून बीट जमादार गुजरकर, शिपाई संजय बोबडे, बालू वैरागडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार चांदे  यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 
  यावेळी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अक्षय बनसोडे व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Youth killed by electric shock at Sahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज