वर्धा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 11:41 IST2019-10-05T11:41:07+5:302019-10-05T11:41:30+5:30
जिल्ह्यातील कारंजा जवळच्या आगरगाव शिवारात शुक्रवारी एका पट्टेदार वाघाने गावातील युवकावर हल्ला चढवून त्याला ठार केल्याची घटना घडली.

वर्धा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार
ठळक मुद्देपरिसरात दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील कारंजा जवळच्या आगरगाव शिवारात शुक्रवारी एका पट्टेदार वाघाने गावातील युवकावर हल्ला चढवून त्याला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात व परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. भुपेश रमेश गाखरे (२२) असे या तरुणाचे नाव असून तो आगरगावचा रहिवासी होता. तो शुक्रवारी जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेला होता. रात्री तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेणे सुरू केले होते. मात्र शनिवारी सकाळी त्याचा मृतदेहच आढळला आहे.