श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी युवकांनी सकारात्मक व्हावे

By Admin | Updated: February 9, 2016 01:50 IST2016-02-09T01:50:33+5:302016-02-09T01:50:33+5:30

यशाची वाट शोधताना विद्यार्थ्यांनी स्वत:मधील मूल्य जागृत करावे.

Youth can be positive for building a better society | श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी युवकांनी सकारात्मक व्हावे

श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी युवकांनी सकारात्मक व्हावे

अपर्णा देवढे : सकारात्मकता विषयावर कार्यशाळा
वर्धा : यशाची वाट शोधताना विद्यार्थ्यांनी स्वत:मधील मूल्य जागृत करावे. स्वत:तील उत्कृष्टतेचा शोध घ्यावा. सकारात्मक विचारांनीच कार्यान्वित व्हावे. युवकांनी श्रेष्ठ समाज घडविण्यासाठी सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब केला तर यश त्यांच्याच हातात आहे, असे मत प्रा. अपर्णा देवढे यांनी व्यक्त केले. ‘इन सर्च आॅफ एक्सलेंस’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे युथ विंग द्वारा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात यशस्वीतेसाठी सकारात्मकता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती, सेवा केंद्र संचालक माधुरीदीदी, सचिन देवगिरकर, प्रा. स्वप्निल धांदे, प्रा. प्रियंका शिंदे, अतुल शिंदे मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भारती यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण करुन यशाचा मार्ग कसा गाठला याचे अनुभव कथन केले. यानंतर बोलताना माधुरीदीदी यांनी परिस्थितींना तोंड देण्यासाठी आंतरिक स्थिती मजबूत करावी, आध्यात्मिक विकास सर्वांगीण विकासाची चाबी आहे. आध्यात्मिकता द्वारेच ते शक्य आहे. मानवीय मूल्य व आंतरिक शक्तीच्या वाढीकरिता आध्यात्मिक व राजयोग ध्यानाचा अभ्यास करावा असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले. संचालन रिना दीदी यांनी केले तर आभार अनुजा दीदी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Youth can be positive for building a better society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.