दूध टँकरने आलेली तरुणी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:36+5:30
अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही २२ वर्षीय ही तरुणी किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत होती. घरमालकाने खोली रिकामी करून मागीतल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. यापूर्वी सदर तरुणीचा स्वॅब अमरावती येथे घेत तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

दूध टँकरने आलेली तरुणी पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणारी तरुणी दुधाच्या टँकरने तळेगाव (श्या.पंत.) नजीकच्या काकडदरा पुनर्वसन येथे मंगळवारी आली. याच तरुणीचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णवाहिकेने अमरावती येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणीचा स्वॅब अमरावती जिल्ह्यातच घेण्यात आला होता, हे विशेष.
अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही २२ वर्षीय ही तरुणी किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत होती. घरमालकाने खोली रिकामी करून मागीतल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. यापूर्वी सदर तरुणीचा स्वॅब अमरावती येथे घेत तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर तरुणी एम. एच. ३१ एफ. सी. २७१५ क्रमांकाच्या दुधाच्या टँकरने तळेगाव नजीकच्या काकडदरा येथे मंगळवारी पोहोचली. त्यानंतर तिला व तिच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान बुधवारी सकाळी या तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे पुढे येताच तिला एका रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तातडीने अमरावती येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या तरुणीच्या निकट संपर्कात कोण आले होते याचा शोध घेतला जात आहे. आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत ४० व्यक्तींना क्वारंटाईन केले होते.
तरुणीची आई अंगणवाडी सेविका
कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यातील काकडदरा गावात आलेल्या या तरुणीची आई अंगणवाडी सेविका असल्याचे सांगण्यात आले. तर ज्या वाहन चालकाने या तरुणीला काकडदरा पर्यंत आणले त्याच्या घराचा परिसर पोलीस प्रशासनाने सील केला आहे.
तातडीने करावयास लावले घर रिकामे
भिष्णूर व काकडधरा येथील तरुणी अमरावती येथील एकाच रुम मध्ये राहत होत्या. १ जून रोजी या तरुणीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. स्वॅब तपासणीला पाठविल्यानंतर या तरुणींना अमरावती येथील रुख्मिनीनगर भागातच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, घरमालकाने या तरुणींना तातडीने रुम रिकामी करण्यास सांगितल्याने भिष्णूर व काकडदरा येथील तरुणी मूळ गावाकडे परतल्या. भिष्णूर येथील मुलगी रात्री उशीर झाल्याने काकडदरा येथेच होती, असे अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.
दहा व्यक्ती आले निकट संपर्कात
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणीच्या निकट संपर्कात सुमारे दहा व्यक्ती आल्याची माहिती अधिकाºयांच्या चौकशीत पुढे आली आहे. या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.