युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

By Admin | Updated: July 31, 2015 02:16 IST2015-07-31T02:16:21+5:302015-07-31T02:16:21+5:30

रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांना हटकले असता त्यांनी धारदार शस्त्राने वार करून एका युवकाची हत्या केली.

The young man's assassination was stabbed | युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

वर्धा : रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांना हटकले असता त्यांनी धारदार शस्त्राने वार करून एका युवकाची हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास स्टेशन फैल परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघा भावंडांना अटक केली आहे.
पिंटू नारायण सोनवणे (३२) रा. स्टेशन फैल असे मृतकाचे नाव आहे. तर वाघ्या उर्फ मनोज भैयालाल उके व संदीप भैयालाल उके दोघेही रा. स्टेशनफैल अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही रात्रीच अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंटू नारायण सोनवने याचा स्टेशन फैल परिसरात फोटो स्टुडीओ आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून घराकडे जाण्याकरिता निघाला होता. दरम्यान रस्त्यात मनोज व संदीप उके हे दोघे उभे होते. या दोघांना रस्त्याच्या कडेला होवून रस्ता देण्याची मागणी केली असता त्यांच्यात वाद झाला. या वादात मनोज व संदीप या दोघा भावंडांनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने पिंटूवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोचार करून त्याला सेवाग्राम रुग्णालयात नेले असता रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर ठाण्यात मनोज व संदीप उके या दोघांविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना रात्री १ वाजताच्या सुमारास स्टेशनफैल परिसरातून अटक करण्यात आली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी मारहाण करण्याकरिता वापरलेले शस्त्र जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा तपास ठाणेदार एम. बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The young man's assassination was stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.