रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकास दुचाकीने उडविले
By Admin | Updated: May 21, 2015 02:03 IST2015-05-21T02:03:17+5:302015-05-21T02:03:17+5:30
रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका युवकास मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकास दुचाकीने उडविले
वर्धा : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका युवकास मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अविनाश बाभुळकर रा. सेलू काटे असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास विमल मंगल कार्यालय, बोरगाव (मेघे) येथे घडली.
पोलीस सूत्रानुसार, अविनाश हा विमल मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान एमएच ३२ झेड ७५८९ या दुचाकीच्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अविनाशला मागाहून जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अमृत बाभुळकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरूद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.(शहर प्रतिनिधी)