शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जखमी बिबट्याचे पिलू मातेपासून भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:45 IST

हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी बिटातील शंकर दिघडे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट मादी व दोन पिल्ले आढळून आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, खरांगणाचे ए.एस. ताल्हण, खरांगणा ठाणेदार निशीकांत रामटेके हे दाखल झाले.

ठळक मुद्देबिबट मादी ऊसाच्या शेतात, बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी बिटातील शंकर दिघडे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट मादी व दोन पिल्ले आढळून आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, खरांगणाचे ए.एस. ताल्हण, खरांगणा ठाणेदार निशीकांत रामटेके हे दाखल झाले. जखमी पिल्लाच्या पायावरील उपचारकरिता त्याला पिपल्स फॉर अ‍ॅनिमलकडे सोपविण्यात आले आहे.दिघडे यांचे शेत हे मदन उन्नई धरणाला लागून आहे. दुपारच्या सुमारास गावातील काही युवक मासेमारी करण्याकरिता धरणावर जात असताना त्यांना धुऱ्यावर बिबट मादी व दोन पिल्लं आढळून आली. त्यांनी ही माहिती गावात देताच घटनास्थळी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली. यामुळे मादी व एक पिल्लू ऊसाच्या शेतात गेले; पण सदर पिल्लाच्या पायाला जखम असल्याने ते धुऱ्यावरील झाडाच्या पाठीमागे दडले. याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, क्षेत्र सहायक के.एस. वाटकर, वनरक्षक पिसे, वनमजूर वाटकर, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे कौस्तुभ गावंडे हे घटनास्थळी दाखल झाले. जमावाला दूर करण्यात आले, तरी ते पिल्लू गेले नाही. यामुळे पिल्लाची शारीरिक तपासणी करण्यात आली. यात त्याच्या पायाला जखम असल्याचे दिसून आले. यावरून सदर पिल्लाला ताब्यात घेत पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात उपचाराकरिता सोपविण्यात आले.धरणाच्या परिसरातील गावांत सातत्याने वाघांचे अस्तित्व राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे; पण आत बिबटाचे पिल्लू आढळल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रसंगावधान राखून गर्दी कमी करीत पिल्लू ताब्यात घेतले.पिल्लू करुणाश्रमातजखमी पिल्लावर उपचार करण्याकरिता त्याला पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे. बिबटाचे पिल्लू डरकाळी फोडेल तेव्हा बिबट मादी डरकाळी फोडून त्याला प्रतिसाद देत होती.तीन तास विश्रांती देऊन त्याला मूळ जागेवर सोडणार होतो; पण नंतर त्याच्या शारीरिक तपासणीत पायाला जखम दिसून आली. सदर बिबटाचे पिल्लू एक महिन्याचे आहे. बिबट मादीवर लक्ष देण्यात येईल. दोन-तीन दिवसांत जखम बरी झाली की त्याला मातेच्या स्वाधीन केले जाईल.- पी.एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.

टॅग्स :Tigerवाघ