जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:51 IST2018-10-02T22:26:25+5:302018-10-02T22:51:08+5:30
सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.

जगातील सर्वांत मोठ्या चरख्याचे लोकार्पण

वर्धा : सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा व शांतता या बाबतचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी असून या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प सर्वांनी करावा.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती अभियान निमित्त महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम येथील सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आश्रमातील विविध विभागांना भेट दिली. चरख्यावर सूत कताई केली. यानंतर यात्री निवास येथे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील विविध आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या गांधी पॅनोरमा-२०१८ फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन येथेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आश्रमात केली सूतकताई
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापूकुटीला भेट दिली. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यांनी सूतमाळेने त्यांचे स्वागत केले. यावेळी मुनगंटीवार यांनी चरख्याजवळ बसून सूतकताई सुद्धा केली.