पोषण सुधारावर कार्यशाळा

By Admin | Updated: February 20, 2015 01:40 IST2015-02-20T01:40:16+5:302015-02-20T01:40:16+5:30

एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण आणि पोषण सुधार कार्यक्रमांतर्गत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी कार्यशाळा घेण्यात आली़ ...

Workshop on Nutrition Improvement | पोषण सुधारावर कार्यशाळा

पोषण सुधारावर कार्यशाळा

हिंगणघाट : एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण आणि पोषण सुधार कार्यक्रमांतर्गत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी कार्यशाळा घेण्यात आली़ यात पोषण सुधारावर मार्गदर्शन करण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल.व्ही. देशमुख तर मार्गदर्शक म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी नि.ना. मोहुर्ले उपस्थित होते़
आरोग्य विभाग व बाल विकास विभाग यांच्यात कसा राखावा, कूपोषण व बदलत्या वातावरणासोबत येणारे आजार तसेच त्याचा सामना कसा करावा याबाबत डॉ. एल.व्ही. देशमुख यांनी मार्गदर्शन केले़ या योजनेंतर्गत उत्तम सेवा देणे, लोकसहभाग वाढविणे आणि ० ते ६ वयोगटातील बालके तसेच गर्भवती व स्तनदा माता यांच्याकडे विशेष लक्ष देणे यासाठी धोरणात्मक चौकटीचे आणि क्षमतांचे बळकटीकरण कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले़ कार्यशाळेला डॉ. वानखेडे, डॉ. वाघमारे, डॉ. शांती मनियाला, पर्यवेक्षिका कल्पना भोयर, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, एएनएम व अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होत्या.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workshop on Nutrition Improvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.