कामगारांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज
By Admin | Updated: July 8, 2015 02:22 IST2015-07-08T02:22:18+5:302015-07-08T02:22:18+5:30
शहरातही बांधकाम कामगारांकडून कष्टाचे, मेहनतीचे काम करून कामाप्रमाणे मजुरी मिळत नाही.

कामगारांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज
विजय जावंधिया : इमारत बांधकाम संघटनेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम
वर्धा : शहरातही बांधकाम कामगारांकडून कष्टाचे, मेहनतीचे काम करून कामाप्रमाणे मजुरी मिळत नाही. महागाई पाहता प्रत्येकाला ८०० रुपये रोज मिळणे गरजेचे आहे. सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी दरमहा २० हजार वेतन घेतो. तेवढेच बांधकाम कामगारांना मिळावे. तसेच शासनाने जाहीर केलेल्या सुविधा मिळवून घेण्यासाठी कामगारांनी संघटीत होऊन संषर्घ करावा, असे आवाहन कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी केले.
वर्धा जिल्हा इमारत बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीने महाकाळ येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून विजय बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच आशा महाकाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत झाडे, उपाध्यक्ष महेश दुबे, सिटूचे सीताराम लोहकरे, राम ठावरी, पांडुरंग राऊत, महाकाळ शाखाध्यक्ष प्रमोद वगारहांडे, उपाध्यक्ष प्रभाकर धवणे, सचिव प्रभाकर हावरे, अजय भगत, उपसरपंच कल्पना फुन्ने उपस्थित होते.
बांधकाम कामगारांना विविध सुविधा मिळवून देणे, सरकारकडे नोंदणी करणे यासाठी सिटू अंतर्गत ईमारत बांधकाम कामगार संघटनेने प्रयत्न करुन जिल्ह्याच्या आठही तालुक्यात ६ हजार ५०० कामगारांची नोंदणी केली आहे.
इमारत बांधकाम कामगारांचे काम जेथे चालते त्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कर्मचारी कमी व कायमस्वरुपी कामगार अधिकारी नसल्याने कामे अडकली आहेत. यासाठी संघटना कार्यरत असून लवकरच कामांना गती येईल असे यशवंत झाडे यांनी सांगितले.
सीताराम लोहकरे, महेश दुबे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी कामगारांनी स्वत: निर्माण केलेल्या चोनकी-ढोलकी कलापथकाची स्फूर्ती गीत सादर केली. प्रदर्शन प्रमोद वगारहांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर हावरे यांनी केले. संचालन उमेश अग्निहोत्री यांनी तर आभार प्रमोद वगारहांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विकास नेहारे, रमेश नागपुरे, निलेश दुधकोहळे, आनंद नेहारे, माया डोंगरे, नरेश चारभे, विलास देहारे, सुरेखा धवने, ओंकार सोनटक्के, शंकर धवने, देवराव नेहारे, हकीम टागोर, दिवाकर डोळे, विष्णू सोनटक्के, लक्ष्मण दुधकोहळे, शरद थुल, वामन भालशंकर, विकास नगराळे, दिनेश करलुके, सुरेश करलुके, सविता हावरे, शीला खाटिककर, शेवंता डायरे यांच्यासह कामगारांनी सहकार्य केले. ग्रामस्थांचीही यावेळी उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)