ंशासनाविरोधात कामगार, शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा
By Admin | Updated: July 12, 2015 02:24 IST2015-07-12T02:24:37+5:302015-07-12T02:24:37+5:30
कामगार-शेतकरी-शेतमजूर यांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी तसेच प्रलंबीत मागण्या पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाच्या विरोधात

ंशासनाविरोधात कामगार, शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा
वर्धा : कामगार-शेतकरी-शेतमजूर यांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी तसेच प्रलंबीत मागण्या पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शनिवारी शेतकऱ्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला राज्यभरातून कामगार, शेतकरी आणि शेतमजूर उपस्थित झाले होते. सकाळी शहरातून हजारोंच्या संख्येत उपस्थितीत मोर्चा काढून शासनाच्या विरोधात नारेबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
अखिल भारतीय किसान सभा वर्धा जिल्हा कमिटीद्वारे स्थानिक बजाज चौकातील एका रिसोर्टमध्ये शनिवारी शेतकऱ्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत प्रमुख वक्ता म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजस्थानचे माजी आमदार आमरा राम, उपाध्यक्ष केरळचे माजी खासदार एस. आर. पिल्ले, सरचिटणीस बंगालचे माजी खासदार हन्नन मोल्ला, सहसचिव बंगालचे विरोधी पक्षनेते आमदार सूर्यकांत मिश्रा, सहसचिव त्रिपूराचे खासदार जितेंद्र चौधरी आणि शेतकरी नेते विजय जावंधिया यांची उपस्थिती होती. जाहीरसभेपूर्वी सभास्थळापासूून हजारोंच्या उपस्थितीत बजाज चौक ते ठाकरे चौकापर्यंत मोर्चा काढून सभास्थळी पोहोचण्यात आले.
शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निघालेल्या मोर्चाचे परिसर दुमदुमून सोडला. यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अतिथींनी विचार मांडले.(प्रतिनिधी)