संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय कामगारांना पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:43 IST2015-08-25T02:43:40+5:302015-08-25T02:43:40+5:30
बांधकाम कामगारांकडे राहायला स्वत:चे घर नसते. त्यांना कुठेतरी झोपड्या बांधून राहावे लागते. मात्र तेच मजबुत आणि

संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय कामगारांना पर्याय नाही
वर्धा : बांधकाम कामगारांकडे राहायला स्वत:चे घर नसते. त्यांना कुठेतरी झोपड्या बांधून राहावे लागते. मात्र तेच मजबुत आणि चांगल्या इमारतीचे बांधकाम करतात. आजही हे कामगार शासकीय सुविधापासून वंचित आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. संघटनांनी याकरिता प्रयत्न करीत आहे. संघटीत होऊन संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही, असे विचार शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.
इमारत बांधकाम कामगारांच्या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष यशवंत झाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय मोहोड, गंगाधर कलवे, महेश दुबे, सिताराम लोहकरे, भैय्याजी देशकर, चंद्रभान नाखले, शरद पालांदूरकर, सुनील भदाडे यांची मंचावर उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक यशवंत झाडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले, बांधकाम कामगार हा विखुरलेला व असंघटीत आहे. त्याला कायद्याद्वारे सामाजीक सुरक्षा मिळत नाही. शासनाने इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन करून विविध सुविधा दिल्या. मात्र त्याचा लाभ घेताना संघर्ष करावा लागतो. जिल्ह्यात हजारो बांधकाम कामगारांनी शासनाकडे नोंदणी केली नाही. त्यांचेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
या मेळाव्याप्रसंगी हिंगणघाट शहरात ज्या कामगारांनी विविध घरे बांधली त्या ज्येष्ठ कामगार मिस्त्रीचा सत्कार केला. मान्यवरांनी नामदेव जमलेवार यांना शाल, श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आली. तसेच अपंग बांधकाम कामगार संजय बोरकर यांचा सत्कार केला. यावेळी सिताराम लोहकरे, भैय्याजी देशकर, महेश दुबे, चंद्रभान नाखले यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला अरुण म्हसकर, नथ्थु धानोरकर, नरेश सातघरे, भास्कर चिरकुटे, वसंत गेडाम, विजय नारायणे, अनिल मसराम, दिलीप कुमरे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)