शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीदिनी शेतकऱ्यांसह कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 23:48 IST

क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल मंदीर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला. मोर्चा जिल्हाकचेरीसमोर पोहाचताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले.

ठळक मुद्देमोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल मंदीर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला. मोर्चा जिल्हाकचेरीसमोर पोहाचताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा करून त्यांना पेन्शन देण्यात यावी. शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्यात यावे. महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही देशी, विदेशी व गावठी दारू ठिकठिकाणी सहज मिळते. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. कामगार विरोधी ठरणारे कायदे रद्द करण्यात यावे. असंघटीत कामगारांना दरमहा १८ हजार रूपये किमान वेतन देण्यात यावे. स्वामीनाथन आयोग शेतकºयांसाठी हितकारक असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. हवालदिल झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. अंगणवाडी-आशा-गटप्रवर्तक शालेय पोषण आहार महिला कामगारांचे प्रलंबित प्रश्न त्वरित निकाल काढण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरण्यात आल्या होत्या.शिवाय सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. मोर्चाचे नेतृत्त्व नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, सुनील घिमे, रंजना सावरकर, अर्चना मोकाशी, अलका जराते, अर्चना घुगरे, मिनाक्षी गायकवाड, अनिल चव्हाण, जगन चांभारे, जानराव नागमोते, सुंदरा देशमुख, अनिता राऊत यांनी केले. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिला पानकावसे, रामभाऊ ठावरी, विलास नागदेवते, शुभांगी कलोडे, निलीमा घाटे, प्रमिला वानखेडे, छबु चहांदे, नंदा गोंडाने, संदीप मोरे, राजू घोडे, राहुल खंडाळकर, प्रिया वडेकर, मोनली मेश्राम, प्रतीक्षा हाडके, दुर्गा काकडे, निर्मला वाघ, संध्या संभे, आशा ईखार, रवींद्र हटकर, कमलाकर मरघडे, भूमिकांत मोहर्ले, पांडुरंग राऊत, रमेश शेळके, रामेश्वर कुनघटकर, संजय भगत, रामराव कावळे यांच्यासह सिटू, किसान सभा, जनवादी महिला संघटना, शेतमजूर युनियन, अंगणवाडी कर्मचारी सेविका-मदतनिस कर्मचारी संघटना, आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, जनरल लेबर युनियन, स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडिया, ईमारत बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा