महिला आरोग्य अभियानाचा समारोप
By Admin | Updated: March 18, 2015 01:53 IST2015-03-18T01:53:51+5:302015-03-18T01:53:51+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभागाच्यावतीन महिलांकरिता १५ दिवस विशेष आरोग्य अभियान राबविण्यात आले.

महिला आरोग्य अभियानाचा समारोप
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभागाच्यावतीन महिलांकरिता १५ दिवस विशेष आरोग्य अभियान राबविण्यात आले. त्या पंधरवड्ययाचा सतारोप मंगळवारी आर्वी नाका परिसरातील ज्ञानेश्वर मंगल मंदिरात करण्यात आला. करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड होते. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आधुनिक जीवनशैली रोगांना आमंत्रण देणारी आहे. पोषक आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे. किशोरवयात मुलींना आढळणारा रक्तक्षय काळजीची बाब आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या पंधरवड्यात पाककृती, पालेभाज्या, विविध डाळी व कडधान्य प्रदर्शन ठेवण्यात आले होते. प्रारंभी डॉ. राठोड यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन केले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मोहरले, नगरसेवक नलिनी पिंपळे, डॉ. धामट दाम्पत्य आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव’वर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, एमएनएम, नर्सिंग स्कूल पाठ्यनिर्देशिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाकरिता अर्चना वानखेडे, नगराळे, हिवरकर, डॉ. डोणे, डॉ. भारती शहा, सविता खुजे, बेबी शेंडे, अर्चना वांदिले यांनी पुढाकार घेतला. मोहरले यांनी कुपोषणाला आळा बसविण्यासाठी गरोदर मातांची काळजी घेण्याचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक डॉ. नितीन निमोदीया यांनी केले.
संचालन अॅड. कांचन बडवाने यांनी केले. उपस्थितांचे आभार खुजे यांनी मानले. यावेळी महिलांना सिकलसेलवर देवांगणा वाघमारे यांनी मार्गदर्शन करीत उपस्थित महिला व मुलींची तपासणी केली. तसेच रक्तदाब, रक्तशर्करा आदी तपासणीही करण्यात आल्या. यावेळी महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)