महिला ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच
By Admin | Updated: June 4, 2014 00:14 IST2014-06-04T00:14:46+5:302014-06-04T00:14:46+5:30
ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय

महिला ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच
वायगाव (नि.) : ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय मंजुरही करावे लागतात. मुख्य ग्रामसभेपूर्वी महिला ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. एवढेच नाही तर ग्रामसभेमध्ये महिलांची उपस्थिती व सहभाग असणे आवश्यक आहे., असे असले तरी यासभा जिल्ह्यात होत नसल्याचे चित्र आहे.
महिलांच्या महत्त्वाच्या समस्येवर व प्रश्नावर महिला ग्रामसभेत चर्चा करण्यात येते; मात्र येथील ग्राम पंचायतीमध्ये महिला ग्रामसभा फक्त कागदावर दाखविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. याकडे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्याच्या युगात बहुतांश क्षेत्रात महिला या पुरूषाच्या बरोबरीने काम करीत आहेत. शिक्षण, राजकारण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रात महिलांना ५0 टक्के आरक्षण देण्यात आले. असे असताना केवळ आरक्षण महत्त्वाचे नसून महिलांना स्वत: निर्णय घेण्याचे व स्वत:चे विचार माडण्याचे काम या महिलांना ग्रामसभेतून करण्याची संधी दिल्या गेली आहे व जे काही त्यांचे प्रश्न आहे ते महिला ग्रामसभेत ठेऊ शकतात. महिलाच्या ग्रामसभेत जे निर्णय घेण्यात येतात ते मंजुरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात येतात. त्यांच्या हितासाठी जी काही कामे करावयाची असतील ती ग्रामसभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्यता देवून याद्वारे महिलांना कार्य करण्याची संधी प्राप्त होते; परंतु ग्रामविकासाच्या कामांत महिलांना मागे ठेवण्यात येत आहे.(वार्ताहर)