शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

स्वयंस्फूर्तीने कोरोनाची लस घेण्यात महिला योद्धाच पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 5:00 AM

जिल्ह्यात आणि देशात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तर नंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे.

ठळक मुद्दे१३ केंद्रांवर व्हॅक्सिनेशन : १४ दिवसांत गाठला अकरा हजारांचा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारत देशासह संपूर्ण जगाला घाम फोडणाऱ्या कोविड-१९ विषाणूला अटकाव घालणारी प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांना यश आले आहे. सध्या कोविडयोद्ध्यांना हिच स्वदेशी लस दिली जात असून, अवघ्या १४ दिवसांत वर्धा जिल्ह्यातील ११ हजार ४९४ कोविड योद्ध्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लस घेणाऱ्यांत तब्बल ७ हजार २९६ महिला  आहेत.जिल्ह्यात आणि देशात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तर नंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा या केंद्रावरून १ हजार ५२१, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथून १ हजार ९५, उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथून ९३१, ग्रामीण रुग्णालय सेलू येथून ६१९, ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथून ७२६, ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथून ५६४, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम (अ) येथून १ हजार १६४, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम (ब) येथून ५६२, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (अ) येथून १ हजार ६०९, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (ब) येथून १ हजार ३२, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (क) येथून १ हजार ६२, ग्रामीण रुग्णालय कारंजा येथून ४३३ तर ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून १७६ व्यक्तींना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 

साडेनऊ हजार व्यक्तींचा विषाणूवर विजयजिल्ह्याच्या कोविड बाधितांच्या संख्येने १० हजार २७७ चा आकडा गाठला असला तरी त्यापैकी ९ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३१० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्यात ३८५ ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार होत आहे.

१.१६ लाख व्यक्तींची झाली कोरोना चाचणीजिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ३३८ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असून, १ लाख १६ हजार ३३१ व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार १६३ व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस