स्त्रियांना आरोग्याबाबत सजग राहावे
By Admin | Updated: June 26, 2015 02:12 IST2015-06-26T02:12:35+5:302015-06-26T02:12:35+5:30
शासकीय आरोग्य योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंयत पोहचविण्यात आचार्य विनोबा रुग्णालयाचे योगदान आहे.

स्त्रियांना आरोग्याबाबत सजग राहावे
वर्धा : शासकीय आरोग्य योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंयत पोहचविण्यात आचार्य विनोबा रुग्णालयाचे योगदान आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आरोग्य सेवेपासून बऱ्याचदा वंचित राहतात. आदिवासी माता भगिनींसाठी आरोग्याचे वरदान असलेल्या या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच आरोग्याबाबत सजग रहावे, असे आवाहन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या शालिनी आदिवासी माता, बाल व किशोरी आरोग्य योजनेचे हिंगणी येथे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, डॉ. वंजारे, सेलू पंचायत समितीच्या सभापती मंजुषा दुधबळे, उपसभापती उल्हास रणनवरे, सदस्य अशोक कलोडे, आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, माजी उपसरपंच अशोक मुडे, अशोक रतनवार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी. गोयल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धमाने, प्रकल्प संचालक डॉ. हरिहरन, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे, तिगांवकर, सामुदायिक औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अभय मुडे, डॉ. वसंत वाघ, सेलू आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष शर्मा, बबलू रोकडे उपस्थित होते.
आदिवासीबहुल ७० गावामध्ये ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत सदर गावात घरोघरी जाऊन गर्भवती मातांची पूर्वतपासणी, बाळंत मातेची नियमित आरोग्य तपासणी, नवजात शिशूंची तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन इत्यादी सुविधा व आरोग्यसेवा प्रदान केल्या जातील, अशी माहिती अभ्युदय मेघे यांनी दिली. तर डॉ. शर्मा यांनी सेलू आरोग्य केंद्रात उपलब्ध आरोग्य सेवा, योजनांची माहिती दिली. यावेळी प्रतिभा दरणे, रुपाला भोजे, नलिनी दुर्गे, तृप्ती नक्षीणे, मंगला भेंडारे या गर्भवती मातांना माहेर कार्ड अतिथींच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. श्रुती नायक, डॉ. सौरवकुमार, आशा सेविका नीता कैकाडी, विनया भरणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर उमाटे, गंगाधर तडस, सुलोचना मोहोड, हेमंत पुंडकर, व्यंकट सोनोने आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)