महिला व विद्यार्थिनींनी रॅलीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
By Admin | Updated: February 13, 2016 01:42 IST2016-02-13T01:42:45+5:302016-02-13T01:42:45+5:30
विविध सामाजिक संघटना, महिला मंडळी, विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागात शहरातून ‘नो व्हेईकल डे’ रॅली काढण्यात आली.

महिला व विद्यार्थिनींनी रॅलीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
नो व्हेईकल डे : महिलांचा प्रथमच सहभाग
आर्वी : विविध सामाजिक संघटना, महिला मंडळी, विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागात शहरातून ‘नो व्हेईकल डे’ रॅली काढण्यात आली. यात प्रथमच महिलांनी सहभागी होत आर्वीकरांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
स्थानिक पावडे हॉस्पिटल येथून शुक्रवारी सकाळी ९ वाजता ‘नो व्हेईकल डे’ ची रॅली निघाली. यातून जनजागृतीची करण्यात आली. यात आर्वीतील संत निरंकारी सत्संग मंडळ व राधास्वामी सत्संग मंडळाच्या महिलांनी स्वत: सायकल चालवून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा संदेश दिला. यावेळी नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती. ही रॅली विश्रामगृह परिसर, आठवडी बाजार मार्गे, पुरुषमलय चौक, गुरूनानक धर्मशाळा येथून गांधी चौक, शिवाजी चौक या मार्गाने निघाली. रॅलीत ‘नो व्हेईकल डे’ कृती समितीचे डॉ. अरूण पावडे, इंडियन मेडिकल असोसिएशन, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, इंडियन रेडक्रॉस असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
कृषक व मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, शिक्षकांनी सहभाग घेतला. समारोप प्रसंगी ‘नो व्हेईकल डे’ बाबतची भूमिका सत्संग मंडळाचे रवी मंछानी व कविता बुधवानी यांनी विषद केली. समारोपाचे संचालन व आभार प्रा. अभय दर्भे यांनी केले. पुढील शुक्रवारी लायन्स क्लबच्यावतीने ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.(तालुका प्रतिनिधी)