अंगावर घराचे छत पडून वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:23 IST2018-05-13T00:23:02+5:302018-05-13T00:23:02+5:30
स्थानिक इंदिरा येथील अशोक चकोले यांचे घर अचानक कोसळले. यात त्यांची आई अनुसया मारोतराव चकोले (८०) यांचा दबून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. तर पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाल्या.

अंगावर घराचे छत पडून वृद्धेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : स्थानिक इंदिरा येथील अशोक चकोले यांचे घर अचानक कोसळले. यात त्यांची आई अनुसया मारोतराव चकोले (८०) यांचा दबून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. तर पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाल्या.
चकोले कुटुंबीय घरात असताना कुडाचे व टिन पत्राच्या असलेल्या घराचा मुख्य फाटा अचानक तुटला व काही कळायच्या आतच छत कोसळले. अशोक यांची पत्नी शशीकला व मुलगी अर्चना (२०) या दोघींना घराच्या बाहेर पडणे शक्य झाले; परंतु त्यांची आई घरातच राहिली. ती मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेली. परिसरातील नागरिकांनी ताबडतोब घटनास्थळावर धाव घेवून वृद्धेला ढिगाऱ्या बाहेर काढले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.
अशोक चकोले यांची परिस्थिती बेताचीच असून रोजमजुरीवर उदरनिर्वाह चालतो. त्यांचे घर कोसळल्यामुळे घरातील सर्व साहित्य ढिगाºया खाली दबले. शासनाने पंचनामा करून त्यांना मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.