स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर मातृत्त्व होय
By Admin | Updated: September 25, 2015 02:47 IST2015-09-25T02:47:48+5:302015-09-25T02:47:48+5:30
स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर ते मातृत्व होय. मातृत्व हे स्त्री आणि पुरूष या दोघांना समप्रमाणात लागू आहे. मातेची व्याख्याच अशी आहे की जिच्या ...

स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर मातृत्त्व होय
सुगन बरंठ : स्त्रियांच्या योगदानावर चर्चा
सेवाग्राम : स्त्री म्हणजे केवळ जननी नव्हे तर ते मातृत्व होय. मातृत्व हे स्त्री आणि पुरूष या दोघांना समप्रमाणात लागू आहे. मातेची व्याख्याच अशी आहे की जिच्या एका ‘थप्पडी’ने संस्कृती जन्माला येतात आणि जिच्या दुधाने मानवाता पोषित होते. मानवता म्हणजे केवळ मनुष्य जातीच नव्हे, तर सृष्टीशी प्रेम होय. ही भावना शिक्षकांच्याअंगी असते. हाच नई तालिमचा गाभा आहे. शिकविणारी स्त्री असो की पुरूष त्यांच्यात मातृत्व असणे गरजेचे आहे, असे विचार डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केले.
नई तालीम समिती द्वारा गुरूवारपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिला या विषयावर राट्रीय परिसंवादाचे आयोजन येथील शांती भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून नई तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. बरंठ बोलत होते.
यावेळी अतिथी म्हणून सरोज देशमुख, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यानंतर सभा घेतली. यात वर्धा डाएटच्या सीमा पुसदकर, उर्मिला हाडेकर, सुषमा शर्मा, सविता शेट्ये, डॉ. एच.के. स्वामी आदींनी उपक्रम व विविध प्रतिकृतीच्या माध्यमातून विचार व्यक्त केले. प्रास्ताविक व संचालन प्रभाकर पुसदकर यांनी केले. परिसंवादात महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ४० शिक्षिका व शिक्षक तसेच छत्तीसगड राज्यातील प्रतिनिधी सहभागी आहेत.(वार्ताहर)