शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुनेला घेण्यासाठी जात असलेल्या सासूवर काळाची झडप; सासरा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 10:33 IST

भरधाव कार वडनेर येथून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या येरणगाव शिवारातील वळणावर आली असता कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

ठळक मुद्देनियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली

हिंगणघाट (वर्धा) : माहेरी गेलेल्या सुनेला आणण्यासाठी कारने जात असलेल्या सासूवर काळाने झडप घातली. भरधाव कार अनियंत्रित होत उलटल्याने सासरे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वडनेर-सिरसगाव मार्गावर येरणगाव शिवारात झाला.

सुवर्णा काशेट्टीवार (६५) असे मृत सासूचे तर रमेश काशेट्टीवार असे गंभीर जखमी सासऱ्याचे नाव आहे. हिंगणघाट येथील रिठे काॅलनी भागातील रहिवासी रमेश काशेट्टीवार व सुवर्णा काशेट्टीवार हे वृद्ध दाम्पत्य सून प्रज्ञा ही तिचे माहेर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे असल्याने तिला आणण्यासाठी कारने (एम. एच. ०२ बी. जी. ६०७८) पुसदच्या दिशेने जात होते.

भरधाव कार वडनेर येथून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या येरणगाव शिवारातील वळणावर आली असता कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्त्याच्या कडेला जात उलटले. यात कारमधील सुवर्णा काशेट्टीवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश हे गंभीर जखमी झालेत. शिवाय कार चालक राहुल आडे रा. हिंगणघाट यालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूwardha-acवर्धा