कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

By Admin | Updated: November 30, 2015 01:59 IST2015-11-30T01:59:34+5:302015-11-30T01:59:34+5:30

देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले.

Without questioning the agriculture sector, the question will not be answered! | कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

सुधीर सावंत : जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महिला अधिवेशन
वर्धा : देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले. त्यामुळे कृषिक्षेत्राचे महत्त्व कमी होऊन वैफल्य, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला. शेतकऱ्यांचा स्वाभिमान परत येण्यासाठी कृषी क्षेत्राला अग्रक्रम द्यावाच लागेल, असे आग्रही मत माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी सहाव्या सत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन, चिंता आणि चिंतन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सावंत बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस किशोर माथनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डी. छाया महाले, देवीदास साबापुरे, नारायण चोपडे, जयश्री कुरूटकर, अनुराधा ठोंबरे, डॉ. रेखा पाटील, लता ढेरे, कांच उल्हे आणि सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, भारतात बाराही महिने सूर्य तळपत असतो. त्यामुळे येथे बारमाही पिके घेता येतात. तरीही आपलेच उत्पन्न आपल्याला पुरत नसल्याची स्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे. शेतकरी आत्महत्या ह्या भारतातच नाही तर इतर देशातही होत आहेत. त्याचे मूळ कारणच भाडवली अर्थव्यवस्थेत शेतीला देण्यात आलेले दुय्यम स्थान. सेवाक्षेत्रामुळे सर्वांना शासकीय नोकरी हवी आहे. त्यामुळे तर कषी क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान पदोपदी दुखावला जात आहे. आपल्याच कुटुंबाचे पालन पोषण करू शकत नसल्याचं शक्य त्याला बोचत आहे. महाराष्ट्रात ४० टक्के शेतकरी आत्महत्या या मुलाच्या लग्नासाठी द्याव्या लागत असलेल्या हुंड्यामुळे होत असल्याचे निरीक्षणही सावंत यांनी यावेळी नोंदविले.
किशोर माथनकर म्हणाले, निखळ शेती करीत असलेला शेतकरीच शेती कसताना काय समस्या येतात हे सांगू शकतो. अनेक क्षेत्र ही केवळ शेतीमुळे जिवंत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांनी शेतीची कदर करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान कमीत कमी खर्चात हळद काढण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या करंजाळा, हिंगोली येथील किसनराव मुळे यांचा सत्कार झाला. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नीला हा सन्मान देण्यात आला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. संचालन प्रज्ञा ब्राह्माणकर तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Without questioning the agriculture sector, the question will not be answered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.