नूतनीकरणामुळे गांधी चित्रप्रदर्शनी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:47 IST2018-04-04T22:47:16+5:302018-04-04T22:47:16+5:30
येथील प्रसिद्ध गांधी चित्रप्रदर्शनी नूतनीकरण सुरू असल्याने अंशकालीन बंद ठेवण्यात येणार आहे. तत्सम फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम पुर्ण होईस्तोवर पर्यटक व दर्शनार्थींना चित्रप्रदर्शनी पाहायला मिळणार नाही.

नूतनीकरणामुळे गांधी चित्रप्रदर्शनी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील प्रसिद्ध गांधी चित्रप्रदर्शनी नूतनीकरण सुरू असल्याने अंशकालीन बंद ठेवण्यात येणार आहे. तत्सम फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने लावण्यात आला आहे. यामुळे बांधकाम पुर्ण होईस्तोवर पर्यटक व दर्शनार्थींना चित्रप्रदर्शनी पाहायला मिळणार नाही.
महात्मा गांधीजींचा आश्रम जगासाठी प्रेरणास्थान ठरला आहे. त्यांची जीवन पद्धती, विचार, तत्त्व, कार्य हे आश्रमातील वास्तू व वस्तूतून दिसून येते. वातावरण मात्र यात आणखी भर घालते. येथील झाडांमुळे निसर्ग सानिध्याचा एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. यामुळे दर्शनार्थींची गर्दी असते. पर्यटकांसाठी आश्रमासह गांधीजींची प्रदर्शनी महत्त्वाची असते. यातून गांधीजींचा जीवनपट समजणे आणखी सोपे होते. यामुळे प्रदर्शनीचे महत्त्व वाढले आहे. चित्रप्रदर्शनी आश्रमची असली तरी मगन संग्रहालय समिती वर्धा यांना चालवायला दिली होती. सध्या नूतनीकरण सुरू असल्याने मगन संग्रहालयाने सेवाग्राम आश्रम समितीच्या निर्णयानुसार प्राकृतिक आहार केंद्र खादी व ग्रामोद्योग केंद्र, साहित्य भंडार बंद करून ११ एप्रिलपासून वर्धा मगन संग्रहालयात स्थानांतरित होणार असल्याचा फलक लावण्यात आला आहे. गांधी अभ्यासक, पर्यटकांना नव्या प्रदर्शनीची प्रतीक्षा करावी लागेल, हे मात्र खरे!