वायरिंग जळाल्याने बस पडली बंद
By Admin | Updated: June 1, 2016 02:38 IST2016-06-01T02:38:15+5:302016-06-01T02:38:15+5:30
राज्य परिवहन मंडळाच्या बसेस भंगार व नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर धावत आहे. यातील काही बस भर रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

वायरिंग जळाल्याने बस पडली बंद
आष्टी (शहीद) : राज्य परिवहन मंडळाच्या बसेस भंगार व नादुरुस्त स्थितीत रस्त्यावर धावत आहे. यातील काही बस भर रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. असाच प्रकार मंगळवारी दुपारी २ वाजता घडला.
तळेगाव आगाराची एमएच २० डी. ९१४९ ही बस १२.३० वाजता वर्धा करिता रवाना झाली. दुपारी २ वाजता ही बस नागपूर-यवतमाळ बायपास वर वायरिंग पेटल्याने अचानक बंद पडली. अवघ्या काही वेळात बसमधून धूर येत असल्याचे पाहुन प्रवाशी धावपळ करीत खाली उतरले. सदर प्रवाशांना भादोड-वर्धा ही बस एम.एच. ४० ८५२४ आल्यावर बसवून देण्यात आले. यामध्ये बराच अवघी गेल्याने प्रवाशांचे हाल हाल झाले आहे.
हा प्रकार आजचाच नसून दररोज भंगार बसेस रस्त्यावर धावत असताना कुठेही बंद पडत असतात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचे सोडून रिमोल्ड केलेल्या टायरवर बसेस धावत आहेत. बसायच्या सिट्स फाटल्याने खिळे रुततात. खिडक्या फुटल्याने कुठलीही सुरक्षा राहिलेली नाही. प्रवाशांनी चांगली सुविधा मिळावी म्हणून वारंवार मागणी होत आहे. असे असतानाही त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
याबाबत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता वरिष्ठांनी पाठविलेल्या बसेस पुन्हा दुरुस्त करून कारभार हाकणे सुरू असल्याचे सांगितले. बसेस दुरुस्ती करण्यावर सद्या भर दिल्या जात आहे. स्पेअर पार्ट टाकून सद्याची गरज पूर्ण केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळी बस बंद पडल्यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे.(प्रतिनिधी)