तुरीच्या पेऱ्यात होणार वाढ
By Admin | Updated: May 29, 2016 02:19 IST2016-05-29T02:19:01+5:302016-05-29T02:19:01+5:30
गतवर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. यामुळे शेतकरी हतबल झाले होते;

तुरीच्या पेऱ्यात होणार वाढ
कृषी विभागाचा अंदाज : शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
आर्वी : गतवर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. यामुळे शेतकरी हतबल झाले होते; पण तुरीचे बऱ्यापैकी झालेले उत्पादन व चांगले दर यामुळे शेतकरी तरले. परिणामी, यंदा शेतकरी तुरीचे पीक घेण्याच्या मानसिकतेत असल्याने तुरीचा पेरा वाढणार, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
यावर्षी तीव्र उन्हामुळे जमीन चांगली तापली आहे. उन्हाळ्यात खरीपाची तयारी म्हणून शेतीची मशागत करावी लागते. यावर्षी उन्हाळा चांगला तापत असल्याने पावसाचे संकेतही समाधानकारक सांगितले आहे. परिणामी, शेतीच्या मशागतीला प्रारंभ झाला आहे. पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा त्रस्त झाला असला तरी रखरखत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा संपला आहे. यामुळे शेतकरी मशागतीला लागला आहे.(तालुका प्रतिनिधी)