पडिक जमीन बनली जंगली श्वापदांचे आश्रयस्थान

By Admin | Updated: June 3, 2016 02:12 IST2016-06-03T02:12:52+5:302016-06-03T02:12:52+5:30

येथून जवळच असलेल्या गुंडमुंड येथील सर्वोदय गो सेवा मंडळाची जमीन गत १० वर्षांपासून पडिक आहे.

Wildlife sanctuaries became a land conditioned | पडिक जमीन बनली जंगली श्वापदांचे आश्रयस्थान

पडिक जमीन बनली जंगली श्वापदांचे आश्रयस्थान

सर्वोदय गोसेवा मंडळाची जमीन : शेजारच्या शेतकऱ्यांवरही त्रास वाढला
पिंपळखुटा : येथून जवळच असलेल्या गुंडमुंड येथील सर्वोदय गो सेवा मंडळाची जमीन गत १० वर्षांपासून पडिक आहे. त्यामुळे या शेकडो एकरात जंगल वाढले असून जंगली श्वापदांचे ते आश्रयस्थान बनले आहे. याचा त्रास आता या जमिनीलगतच्या शेतकऱ्यांनाही सोसावा लागत आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांवरही जमीन पडिक ठेवण्याची वेळ आली आहे.
गत दहा वर्षांपासून शेती परवडत नाही म्हणून मंडळाची जमीन पडिक आहे. जनावरांना चारण्याकरिता ही जमीन हंगामापुरती दिली जाते. मात्र या पडिक जमिनीच्या चारही बाजूला पिंपळखुटा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी असून त्या वाहितीत आहे. पण पेरणी पासून तर पीक घरी येईपर्यंत शेतकऱ्यांना हिंस्त्र जनावरांपासून पिकांची राखण करावी लागते. पडिक असलेल्या गो सेवा मडळाच्या जमिनीमध्ये वास्तव्यास असलेल्या जंगली श्वापदांमुळे या शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढले आहे. शेतकऱ्यांनी गो सेवा संस्थेच्या संचालकाची भेट घेत या पडिक जामिनीमुळे इतरांना होत असलेल्या त्रासाविषयी माहिती दिली. पण समस्या ऐकून घेण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रारीचे निवेदन सादर करून ही बाब कथन केली.
ही संस्थेची पडिक जमीन वाहीपेरीकरिता वापरावी जेणेकरून जंगली श्वापदे तिथे राहणार नाही किंवा आमची जमीन संस्थेनी वाहिपेरीकरिता वापरावी व आम्हाला एकरी ५ हजार रूपये मोबदला द्यावा, अशी विनंती शेतकरी कृष्णराव नेपटे यांनी लेखी निवेदनात केली आहे. या जनावरांना धुडगूस आता गावांमध्येही वाढला आहे. या जनावरांचा बंदोवस्त करण्याची मागणी येथील पीडित शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: Wildlife sanctuaries became a land conditioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.