शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

बुद्ध पौर्णिमेला चंदेरी प्रकाशात वन्यप्राणी प्रगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:12 PM

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी शनिवारी, १८ ला वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येणार असून याकरिता वनविभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांच्या परिसरात तब्बल ८४ मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवनविभाग सज्ज : आठ वनपरिक्षेत्रात ८४ मचानींची व्यवस्था

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुद्धपौर्णिमेच्या दिवशी शनिवारी, १८ ला वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येणार असून याकरिता वनविभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांच्या परिसरात तब्बल ८४ मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.दरवर्षी संपूर्ण देशात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या प्रगणनेचा उपक्रम वनविभागाकडून आयोजित केला जातो. या दिवशी १८ मे ला सायंकाळी ४ वाजता प्रगणनेला सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता प्रगणना समाप्त होईल. याकरिता जिल्ह्यातील ८ वनपरिक्षेत्रात एकूण ८४ मचाणांची व्यवस्था वर्धा वनविभागातर्फे करण्यात आली आहे. प्रगणननेत सहभागी होण्याकरिता बुधवार अखेरचा दिवस असून वनविभागात आवेदन करता येणार आहे. अवादेनाच्या पडताळणीनंतर मचाणाच्या स्थळाचे वितरण होणार आहे. प्रगणननेत १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना सहभागी हाता येणार असून निवड झालेल्या व्यक्तींना १८ ला ओळखपत्र दिले जाणार आहे. आठही वनपरिक्षेत्रात प्रत्येकी १५ ते १६ ट्रॅप कॅमेरे लागलेले असून १५० कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठे आहेत. कारंजा वनपरिक्षेत्रात २६, आष्टी २३, तळेगाव २९, आर्वी २६, हिंगणी १२, वर्धा ३, समुद्रपूर १२ तर खरांगणा वनपरिक्षेत्रात १९ पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पाणवठे भरण्याकरिता वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सौर ऊर्जेवरील पंप, हातपंप, इतकेच नव्हे तर बैलबंडीच्या सहाय्याने प्लास्टिक ड्रमने पाणी आणले जाते. जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, सांबर, रानकुत्रे यासह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. बुद्धपौर्णिमेला चंद्राचा प्रकाश असतो. वन्यप्राणी सायंकाळनंतर पाणवठ्यांवर येत असल्याने गणनेस मदत होते.सोबत या वस्तू नकोच...प्रगणनेत सहभागी होणाऱ्यांनी भडक, आकर्षक रंगाचे कपडे परिधान करू नये. तसेच सिगारेट, सुगंधित तेल, पावडर, परफ्युम, डिओ स्प्रे, सर्चलाईट, टॉर्च, कॅमेरा या वस्तूंचादेखील वापर करता येणार नसून दुर्बिणीचा मात्र वापर करता येणार आहे.वनविभागाच्या वतीने एका मचाणावर एक अथवा दोन व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. वनकर्मचारीदेखील यावेळी सोबत असणार आहे. प्रगणनेकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नसून जेवण, पाणी, चटई, चादर आदीची व्यवस्था सहभागींना करावयाची आहे. खाद्यपदार्थ आणण्याकरिता सिल्व्हर फॉईलचा वापर करावा.- एन. जे. चौरे, सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक), वर्धा.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव