शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धक्कादायक! पत्नीने पतीलाच करायला लावला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 11:15 IST

आर्वी तालुक्यातील एका गावात महिलेनं आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देसूडापोटी कृत्यआर्वी तालुक्यातील घटनाआरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

देऊरवाडा/आर्वी : संशयी वृत्तीच्या पत्नीने थेट आपल्या पतीला गावातीलच एका १४ वर्षीय मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करावयास लावल्याची धक्कादायक घटना तक्रारीनंतर रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून, आरोपी दाम्पत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारुती मारबदे तसेच प्रिया मारुती मारबदे दोन्ही रा. (मोटोडा) बेनोडा, अशी आरोपींची नावे आहेत.

अल्पवयीन पीडिता ही घरी एकटी हजर असताना आरोपी प्रिया हिने तिला घरी बोलावले. पीडिता ही आरोपीच्या घरी येताच आरोपी प्रिया हिने तिला तू मारुती याच्यासोबत लग्न कर, असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून घराबाहेर निघून गेली. दरम्यान, आरोपी मारुती याने पीडिता ही एकटी असल्याचे हेरून तिच्यावर जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर आरोपी प्रिया ही घरी परतली. त्यानंतर तिने पती मारुती याला पीडितेवर तिच्या डोळ्यासमोरच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करावयास लावले. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सदर प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडितेला दिली.

आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या पीडितेने घरी पोहोचल्यावर संपूर्ण प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनीही आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपी दाम्पत्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ तसेच भादंविच्या कलम ३७६ (३), ७६ (२) (एन), ३६६ (अ.), ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

- भानुदास पिदूरकर, ठाणेदार, आर्वी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPOCSO Actपॉक्सो कायदाhusband and wifeपती- जोडीदार