सेवाग्राम ते पवनार मार्गाचे रूंदीकरण करा
By Admin | Updated: December 20, 2015 02:14 IST2015-12-20T02:14:58+5:302015-12-20T02:14:58+5:30
जिल्ह्यातील पवनार व सेवाग्राम आश्रम ही आंतरराष्ट्रीय महत्त्वप्राप्त पर्यटन स्थळे जोडण्यात आली आहेत;

सेवाग्राम ते पवनार मार्गाचे रूंदीकरण करा
दोन माहात्म्यांचे आश्रम जोडणारा मार्ग : रामदास तडस यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वर्धा : जिल्ह्यातील पवनार व सेवाग्राम आश्रम ही आंतरराष्ट्रीय महत्त्वप्राप्त पर्यटन स्थळे जोडण्यात आली आहेत; पण सदर रस्ता अरुंद आहे. यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून सदर रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेद देण्यात आले.
सेवाग्राम व पवनार हे दोन्ही महात्म्यांचे आश्रम राज्य महामार्ग क्र. ३२८ ने जोडले आहे. सदर रस्ता नागपूर येथून येणाऱ्या पर्यटकांना थेट पवनार ते सेवाग्राम जाण्याकरिता सोईचा आहे. सदर रस्त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना सादर करण्यात आला आहे. १२ कोटी ३० लाख रुपये खर्च या कामासाठी अपेक्षित आहे. यात लहान पुलांच्या रुंदीकरणाचा समावेश असून सहा किमी लांबीचा हा रस्ता आहे. पवनार व सेवाग्राम आश्रम हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ जोडरस्त्याच्या रूंदीकरण, मजबुतीकरण व सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी सेवाग्राम विकास आराखडा संनियंत्रण समितीचे सदस्य खा. रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत या रस्त्याचा समावेश झालेला नाही. पर्यटकांच्या व नागरिकांच्या सोईच्या दृष्टिकोनातून सदर मार्ग मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शिवाय वर्धा येथील भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेत सेवाग्राम ते पवनार रस्त्याच्या रूंदीकरणाची मागणी रेटून धरल्याचे खा. तडस यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)