प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची रुंदी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:30+5:30
या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले. एकूणच या योजनेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण रस्ते गुळगुळीत होणार आहेत.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची रुंदी वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागातील रस्ते गुळगुळीत होत नागरिकांना सुविधा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले. एकूणच या योजनेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण रस्ते गुळगुळीत होणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९७७ कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्याच्या विषयाला मंजूरी मिळाली होती. त्या अनुषंगाने २४१.७० कोटींचा निधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यात आली. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एकूण २६६.६६ कोटींचा निधी खर्च करून ९६० कि़मी.चे रस्ते बांधण्यात आले. तर याच योजनेच्या दुसºया टप्प्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रत्यक्ष काम करण्यात आले. दुसºया टप्प्यात ४१.९५ कि.मी.चे रस्ते बांधण्याच्या विषयाला वरिष्ठांकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर २५.११ कोटींचा निधी याविभागाला प्राप्त झाला.
मंजूर कामापैकी शंभर टक्के म्हणजे ४१.९५ कि़मी.चे रस्ते २२.७२ कोटींचा निधी खर्च करून बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर सदर योजनेच्या तिसºया टप्प्यात करावयाच्या कामाचे प्रभावीपणे नियोजन सध्या केले जात आहे. तिसºया टप्प्यात ज्या ३ किंवा ३.७५ मिटरच्या रस्त्यांना दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या रस्त्यांचे साडेपाच मिटरपर्यंत रुंदीकरण तसेच मजबुतीकरण केले जाणार आहे.