लसीकरणानंतर ॲंटिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST2021-07-19T05:00:00+5:302021-07-19T05:00:16+5:30
जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील अडीच हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. ॲंटिबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज आहे का, हे या टेस्टद्वारा तपासलं जाते.

लसीकरणानंतर ॲंटिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एखाद्या विषाणूशी लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती प्लाझ्माद्वारा प्रोटीनच्या पेशी निर्माण करते. या पेशी शरीरात शिरलेल्या ॲंटिजन्सवर जाऊन चिकटतात. या प्रक्रियेमुळे विषाणूची मोठ्या प्रमाणात ऐरव्ही होणारी निर्मिती थांबते. आणि शरीरात जास्त संसर्ग होत नाही, त्यामुळे लसीकरणानंतर ॲंटिबॉडीज तपासणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील अडीच हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.
ॲंटिबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज आहे का, हे या टेस्टद्वारा तपासलं जाते. अँटिबॉडीज आहेत याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे, आणि त्याच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठीची यंत्रणा तयार झालेली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने दोनदा सिरो सर्वेक्षण करण्यात आले. लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यात जर कोरोनाशी लढणाऱ्या ॲंटिबॉडीज दिसल्या तर त्यांना कोरोना संसर्ग होऊन गेला हे ओळखता येतं. यासाठी या टेस्टचा वापर केला जातो.
२२५० रक्त नमुने केले गोळा
कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामच्या वतीने जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार दोनवेळा सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २२५० रक्त नमुने गोळा करण्यात आले. अनेकांमध्ये ॲंटिबॉडीज तयार झाल्याचे आरोग्य चमूला समजून आले.
तरुणांची संख्या जास्त
जिल्ह्यात ॲंटिबॉडीज सर्वेक्षण करण्यात आले. दोनदा हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सुमारे अडीच हजारांवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रात तरुणांमध्ये ॲंटिबॉडीज तयार झाल्याचे पुढे आले.