शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. 

ठळक मुद्देग्रामीण प्रवाशांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी महामंडळाने लांब पल्ला,  आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात अद्यापही बसेस जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांची मोठी गरसोय होत आहे.  त्यामुळे गाव तेथे एसटी हे ब्रीद नावालाच ठरत असल्याचे दिसून येत आहे.मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. यामुळे एसटीही पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. वर्धा विभागाअंतर्गत वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) असे पाच आगार असून, पाचही आगार मिळून एकूण २२८  एसटी बसेस आहेत. कोरोना संकट काळापूर्वी सर्वच बसेस धावत होत्या. आठशेवर फेऱ्या दररोज होत होत्या. दररोज  सरासरी २० लाख इतके वाहतूक उत्पन्न वर्धा विभागाला मिळत होते. कोरोना काळात विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दररोज २०० ते २१० बसेस धावत असून, ३८०-४०० फेऱ्या होत आहेत. मात्र प्रवासी संख्येअभावी अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी बसेस पोहोचत नसल्याने ग्रामीण नागरिकांना खासगी वाहन अथवा काळी-पिवळी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

खेडेगावांत जाण्यासाठी काळी-पिवळीचा आधारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यानंतर एसटीची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दररोज २०० बसेस धावत असून, ४००  च्या जवळपास फेऱ्या होत आहेत. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत. यामुळे ग्रामीण प्रवाशांना काळी- पिवळी वाहनांचा आधार घेत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच! nवर्धा विभागातील पाचही आगार मिळून २०० च्या जवळपास बसेस सोडल्या जात आहेत. दररोज ३८० ते ४०० फेऱ्या होत आहेत.  दररोज हजार-दीड हजार किलोमीटरचा प्रवास होत असून, केवळ तालुका ठिकाणापर्यंतच होत आहे. यामुळे ग्रामीण प्रवाशांची गैरसोय कायमच आहे.

अद्याप उत्पन्नाला फटकाnदुसरी लाट ओसरल्यानंतर वर्धा विभागाकडून दररोज २०० बसेस सोडल्या जात असून, हजारावर किलोमीटर बसेसनी प्रवास केला. मात्र डेल्टा प्लसमुळे प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नसल्याने दररोज ८ ते १० लाखांचे वाहतूक उत्पन्न वर्धा विभागाला मिळत आहे. विभागाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

खेडेगावावरच अन्याय का? 

कोरोनामुळे दीड महिना एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णतः ठप्प होती. आता एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे. दररोज २०० च्या जवळपास बसेस सोडल्या जात आहेत. मात्र प्रवाशांचा अद्याप हवा तसा प्रतिसाद नसल्याने  काही ग्रामीण भागाकडे बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन यापुढे सर्वच बसेस सोडू.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, वर्धा.

कोरोनामुळे विस्कळीत झालेले जीवन हळूहळू पूर्व पदावर येत आहे. एसटीची वाहतूक पूर्व पदावर आलेली आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसेस पोहोचत असताना, दुर्गम भागात अद्याप बसफेऱ्या सोडण्यात येत नाहीत. ग्रामीण प्रवाशांवरच हा अन्याय का? - विलास लभाने, प्रवासी, गिरड.

खरीप हंगाम तोंडावर असताना कोरोना संकटामुळे दीड महिना एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे शेतीसाठी लागणारे, बी-बियाणे अवजारे खरेदीवर मोठा परिणाम झाला. शहराच्या ठिकाणी बसफेऱ्या सोडल्या जात असताना, ग्रामीण भागावरच अन्याय का? ग्रामीण जनतेची गैरसोय टाळण्याकरिता बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात.- दगडू महाजन,  ग्रामीण प्रवासी.

 

टॅग्स :state transportएसटी