मतदानातील एक टक्का वाढ कोणाच्या पत्थ्यावर ?
By Admin | Updated: October 18, 2014 01:47 IST2014-10-18T01:47:45+5:302014-10-18T01:47:45+5:30
राजकीय अस्तित्वासाठी आर्वीत अत्यंत चुरशीची व काट्याची लढत वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे.

मतदानातील एक टक्का वाढ कोणाच्या पत्थ्यावर ?
सुरेंद्र डाफ आर्वी
राजकीय अस्तित्वासाठी आर्वीत अत्यंत चुरशीची व काट्याची लढत वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. निवडणुकीच्या दिवशी कार्यकर्त्यांत झालेली वादावादी हे त्याचेच द्योतक आहे. आर्वीत यंदा झालेल्या निवडणुकीत एक टक्का वाढला आहे. आता हा एक टक्का कोणाच्या पत्थ्यावर येतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
२००९ मध्ये आर्वी विधानसभा क्षेत्राची मतदानाची टक्केवारी ६७.४६ होती. २०१४ च्या विधानसभेत ही एका टक्क्याने वाढून ६८.१३ एवढी झाली आहे. यात तरुण व पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. १५ उमेदवारात ही लढत अखेरच्या दोन दिवसात भाजपा व काँग्रेस या अशा थेट लढतीत परिवर्तित झाली. यात दोन्ही उमेदवार विजयाची खात्री बाळगून आहे. परंतु यात कोण बाजी मारणार यांची चर्चा सध्या सर्वत्र आहे. १९ आॅक्टोबरला सकाळी ८ वाजतापासून येथील गांधी विद्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रियेदरम्यान व त्यादिवशी काही मतदान केंद्रावर भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. १९ तारखेची मतमोजणीची शांततेत पार पाडण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गांधी विद्यालयात या ठिकाणी मतमोजीण केंद्रात जय्यत तयारी व कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. महसूल प्रशासनाच्यावतीने याची विशेष दखल घेण्यात येत आहे. मतमोजणीची सर्वांना प्रतीक्षा आहे. निवडणुकीत कोण निवडून येणार याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदानाच्या टक्केवारील एक टक्क्याची वाढ कोणाला लाभदायक ठरते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.