‘या माकडांना कुणी तरी आवरा हो!’

By Admin | Updated: December 10, 2015 02:22 IST2015-12-10T02:22:24+5:302015-12-10T02:22:24+5:30

‘या माकडांना कुणीतरी आवरा हो’, अशी हार्त हाक नागरिक वाहनचालक आणि शेतकरी देत आहे.

'Who is there in this monkey?' | ‘या माकडांना कुणी तरी आवरा हो!’

‘या माकडांना कुणी तरी आवरा हो!’

शेतकरी, वाहन चालकांचा टाहो : शेतातील टॉवरला तारांचे कुंपण
सेवाग्राम : ‘या माकडांना कुणीतरी आवरा हो’, अशी हार्त हाक नागरिक वाहनचालक आणि शेतकरी देत आहे. उंच टॉवर माकडांसाठी सुरक्षित झाले; पण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चक्क टॉवरलाच चारही बांजूनी काट्यांचे कुंपण करून माकडांचा बंदोबस्त करावा लागत असल्याचे वघाळा, कोपरा शिवारात दिसून येते.
जंगलातील माकडे गत काही वर्षांपासून कळपाने शेत, गाव आदी ठिकाणी आश्रयाला आले. या माकडांनी सर्वत्र चांगलाच उच्छाद मांडल्याने सर्वच त्रस्त झाले. जीव मेटाकुटीस आला आहे. खरांगणा (गोडे) ते हमदापूर मार्गावर सकाळी व सायंकाळी गुल्लेर, बांबू आदी साहित्य हातात घेत माकडांना पळविताना शेतकरी, मजूर व मालक दिसतात. सोबत कुत्रीही असतात. माकड बांबू व कुत्र्यांना घाबरत नाही; पण गुल्लेरला घाबरतात, असे शेतकरी सांगतात.
शेतात कपाशीला बोंडे, तुरी तसेच कोवळा चना आहे. सेवाग्राम ते हमदापूर मार्गावर असंख्य झाडे व पाणी असल्याने माकडांचे कळप दिसतात. ते शेतातील पिके खातात व नुकसान करतात. मुख्य मार्गावरही बसून असतात. वाहन व माणूस यांची भीती त्यांना राहिली नाही. गावातही वेगळी परिस्थिती नाही. फळांची झाडे, वेल व परसबागेचे नुकसान करतात. कवेलू फोडतात. वाळवण टाकणे महिलांना कठीण झाले. पाण्याची टाकी व प्लास्टिकचे पाईप फोडण्याचे कामही माकडे करीत आहे. माकडांना हुसकावणे जिकरीचे झाले आहे. मानव, जनावरांचा सहवास लाभल्याने ते अधिक निर्भीड झाले; पण होणारे नुकसान सर्वांच्या त्रासदायक ठरत आहे. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: 'Who is there in this monkey?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.