सेलू तालुक्यातील पांढरे सोने आर्वीच्या बाजारपेठेत

By Admin | Updated: January 11, 2015 23:03 IST2015-01-11T23:03:43+5:302015-01-11T23:03:43+5:30

लांब धाग्याचा कापूस उत्पादित करणाऱ्या तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात आर्वी व अन्य बाजारपेठांत शेतकरी विक्रीस नेत आहे़ यामुळे येथील कापसाची बाजारपेठ ओस पडली आहे़

In the white gold Arvi market in Selu taluka | सेलू तालुक्यातील पांढरे सोने आर्वीच्या बाजारपेठेत

सेलू तालुक्यातील पांढरे सोने आर्वीच्या बाजारपेठेत

सेलू : लांब धाग्याचा कापूस उत्पादित करणाऱ्या तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात आर्वी व अन्य बाजारपेठांत शेतकरी विक्रीस नेत आहे़ यामुळे येथील कापसाची बाजारपेठ ओस पडली आहे़
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सेलू येथे उपबाजारपेठ आहे़ तालुक्यात कापसाची बाजारपेठ म्हणून या उपबाजार समितीची ओळख होती. या बाजारपेठेत नागपूर जिल्ह्यातूनही काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होत होती. यापासून मोठा शेस बाजार समितीला प्राप्त होत होता़ गत पाच ते सहा वर्षांत या तालुक्यातील उच्च प्रतिचा लांब धाग्याचा कापूस आंजी, खरांगणा आणि आर्वी येथील बाजारपेठेत विकला जात आहे़ तालुक्यातील कापूस दुसऱ्या बाजारपेठेत जाण्याच्या कारणाकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे़ यंदा कापसाची आवक अत्यल्प झाल्याचेही दिसून येत आहे़(शहर प्रतिनिधी)

Web Title: In the white gold Arvi market in Selu taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.